न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- ‘इर्टिगा कार’ ही शोरुम किंमतीपेक्षा कमी किंमतीत व लवकर डिलीव्हरी देतो, असा आरोपी १ ते ५ यांनी कट करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी फिर्यादीकडून एकुण १०,५०,८४३ रुपये घेतले. त्या बदल्यात त्यांना कार न देता, तसेच घेतलेली रक्कमही परत दिली नाही. फिर्यादीच्या मित्राच्या मोबाईलवर त्यांची रक्कम परत दिल्याचा बनावट टेक्स मेसेजचा स्क्रिनशॉट पाठवून, तो खरा असल्याचे भासवत फिर्यादीने दिलेल्या रक्कमेचा आरोपींनी अपहार करुन फसवणुक केलेली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०२/१२/२०२३ ते दिनांक ०१/०१/२०२४ दरम्यान) ड्रिम्स कार, पर्पल प्राईड स्क्वेअर बिल्डिंग, बैंक ऑफ बडोद्याचे बाजूला, काळेवाडी फाटा येथे घडली. फिर्यादी शंकर दिलीप गायकवाड (वय २९ वर्षे, धंदा दुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स) यांनी आरोपी १) अजित कुळाल, २) सौरभ ऊर्फ संदिप सुनिल काकडे, ३) शुभम मनाळकर, ४) विकास राठोड, ५) मयुरी व इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ४७९/२०२४ भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४७१, १२० (३), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. २ याला अटक केली आहे. पोउपनि सावर्डे तपास करीत आहेत.