न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- ‘रस्त्यावर लावलेली गाडी बाजला काढून घे, माझ्या गाडीला जाण्यासाठी रस्ता दे’ असे शेजारी राहणारे फिर्यादी आरोपीला म्हणाले. आरोपी नंबर १ याने त्याना ‘मी काढत नाही, तुला जे काही करायचे ते कर’ असे म्हणून वाईट वाईट शिवीगाळ केली. ‘ही जागा आमच्या मालकीची आहे’ असे म्हणुन त्यांची गचंडी पकडुन त्यांना हाताने व लाथा बुक्कयांनी मारहाण केली व खाली पाडुन पोटात व छातीवरही मुक्का मार दिला. तर, इतर आरोपींनीही एकत्रीत येऊन गैरकायदयाची मंडळी गोळा करून आरडा ओरडा केली.
दरम्यान यातील आरोपी नंबर ३ हा फिर्यादीजवळ येऊन त्यांच्याकडे रागाने पाहून ‘हयाला जास्त माज आहे, हयाचा आज माज मोडून टाक’ असे म्हणून पाठीत लाथा मारल्या व वाईट वाईट शिवीगाळ केली. तर आरोपी क्र ४ व ५ यांनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्याने पोटात व गालावर मारुन फिर्यादीला मुक्का मार दिला. तर आरोपी क्र २ याने जवळ पडलेला दगड मारण्यासाठी उचलला, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
मारहाणीची ही घटना (दि. १५) रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास नगरपंचायत ऑफीसच्या पाठीमागे, चव्हाणनगर, देहुगांव येथे घडला. फिर्यादी किरण गोपाळ चव्हाण (वय ४४ वर्षे) यांनी आरोपी १) महिला आरोपी, २) प्रकाश बाळकृष्ण घनवट, ३) सुशांत ऊर्फ बंटी प्रकाश घनवट, ४) महिला आरोपी, ५) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी २२४/२०२४ भादविक ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खणसे तपास करीत आहेत.