न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- घरात जबरदस्तीने घुसून “तुझ्या मुलाने काय आय घातली तुला माहीत नाही का?, आता त्याची फळे भोगायला तु तयार रहा. म्हाताऱ्या तुला जर तुझ्या मुलाला माझ्यापासून वाचवायचे असेल तर, त्या बदल्यात मला ३०,००० रुपये दयावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाला कोठे मारून टाकेल, हे तुला समजणार देखील नाही”, अशी धमकी देत खंडणी मागीतली.
(दि. १७) रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास साई भुमी अपार्टमेन्ट, साने चौक, कृष्णानगर, चिंचवड येथे ही घटना घडली. याप्रकरणी मारूती रामराव भंडारे (वय ७३ वर्ष, सेवानिवृत्त) यांनी आरोपी प्रमोद भुरे (रा. रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी चिखली) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलिसांनी २२४/२०२४ भादवि कलम ३८५,४५२. ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनिरी पंचमुख तपास करीत आहेत.