न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- ‘मी इथला भाई आहे, मला आताच्या आता एक हजार रूपये दे, नाहीतर तुला सोडणार नाही’ अशी विधीसंघर्षीताने धमकी देत बेकरी समोर असणाऱ्या काचेच्या काऊंटरवर कोयता मारून त्याची काच फोडली.
त्याला बेकरीचालक पैसे देत नसल्यामुळे बेकरीमध्ये येवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून ड्रॉवरमधील १००० रु जबरदस्तीने काढून घेतले. पैसे घेतल्यानतंर ‘मी इथला भाई आहे, माझे कोणी काही करू शकत नाही’, असा दम देवून तो कोयता फिरवित निघून गेला, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १८) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास महात्मा फुले चौक, चाकण येथील क्राउन बेकरीमध्ये घडला.
फिर्यादी फैसल अकरम अन्सारी (वय २२ वर्षे व्यवसाय बेकरी चालक) यांनी आरोपी विधीसंघर्षित बालक (वय १७ वर्षे, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी २६६/२०२४ भादवि कलम ३९२,४५२, ४२७, क्रिमीनल अॅ. कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चौगुले तपास करीत आहेत.