न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- कामावरुन काढुन टाकल्याचा राग मनात धरुन सुडबुध्दीने दुकानात प्रवेश केला. फिर्यादीच्या १) टाटा एस नं, एम.एच.१४/एफ.टी. ५७७५, २) टाटा कंपनीचा ७०९ नंबर एम, एच.१५/ए,जी. ६९१८ तसेच विशाल नाथाराम गिते, यांचा ३) टाटा कंपनीचा छोटा हत्ती नं एम, एच, १४ जी, डी, ५२६९ व महेंद्र मोहन गावढे, यांची ४) पिकअप नं. एम, एच १६ एफ, टी -७८३७ या चार वाहनावर आरोपीने प्लास्टीक कॅन्ड मधून आणलेले डिझेल ओतुन ती पेटवुन देत अंदाजे ४,००,०००/- रुपयांचे नुकसान केले आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी रात्री ००.३० च्या सुमारास ओम साईराम ट्रेडर्स दुकान, गणेशनगर, तळवडे येथे घडला. फिर्यादी प्रशांत धनाजी रुपनवर (वय ४२ वर्ष) यांनी आरोपी केशव निवृत्ती गाढवे (वय ३८ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २२३/२०२४ भादवि. ४५२,४३५, ४२७. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पंचमुख तपास करीत आहेत.