न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- तळेगाव दाभाडे येथील सार्वजनिक संडासजवळ असलेल्या कच-याच्या ढिगा-याजवळ (दि. १७) रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास अज्ञात महिलेने नवजात एका दिवसाच्या पुरुष जातीच्या अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत अपत्य जन्माची लपवणुक केली आहे.
याप्रकरणी अज्ञात महीलेच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात २३८/२०२४ भादवि कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुल्ला पुढील तपास करीत आहेत.