न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- पिंपरी पो स्टे हद्दीतील एकुण ३२ ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमे-यांच्या जंक्शनवर बसविण्यात आलेल्या एचबीएल कंपनीच्या १०० ए. एच. पॉवरच्या एकूण २८९ बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत.
प्रतिबॅटरी किं.रू. २,००० जु.वा.किं.अं. असे एकूण कि.रू. ५,७८,००० च्या बॅटऱ्या चोरी झाल्या आहेत. हा प्रकार (दि.२४/०३/२०२४ ते दि.१५/०४/२०२४) दरम्यान उघडकीस आला आहे.
राकेश आत्माराम गोळे (वय ४२ वर्षे, धंदा नोकरी टेक महिंद्रा प्रा लि) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फियाद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी ३७९/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा बेंदरकर तपास करीत आहेत.