न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- तीन वर्षापासुन राहण्याची जागा बदलुन पोलीसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विलास बाळशीराम मोरे (वय ३८ वर्षे, रा. दिघी रोड, भोसरी) असं ताब्यात घेतलेल्या आरोपीच नाव आहे.
त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. १६३/२०२१ भादंवि कलम ३७९,३४ या गुन्हयातील सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा, युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी विलास मोरे याला भोसरी येथुन ताब्यात घेतले आहे.
आरोपी विलास बाळशीराम मोरे याचेकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याचेवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.