न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरटयांना दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघड करून दाग-दागिने जप्त केले आहेत. आरोपी अतुल चंद्रकांत अमले (वय २८ वर्षे, रा. सिध्देश्वरनगर, विश्वकर्मा मंदिराजवळ, वारजे माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला जेरबंद केले आहे.
तसेच त्याच्याकडून दुसऱ्या आरोपीचा माग काढून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. रोहित दिपक सातपुते (वय २८ वर्षे, रा. शंकरमठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दोन्ही अरोपींना शिताफीने ताब्यात घेवून गुन्हयामध्ये अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेले दाग-दागिने जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत. तसेच नमुद गुन्हयातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत असून त्यातील आरोपी अतुल आमले याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळ्या प्रकारचे ३२ गुन्हे दाखल असून आरोपी रोहित सातपुते याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळ्या प्रकारचे १६ गुन्हे दाखल आहेत.