न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- पिपरी-चिंचवड शहरात भजन, कीर्तन, पूजा-अर्चा, महाअभिषेक अशा धार्मिक वातावरणात मंगळवार (दि. २३) रोजी शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील निगडी- प्राधिकरण, बिजलीनगर, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपरी, चिंचवडगाव तसेच काळभोरनगर येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बिजलीनगर येथील हनुमान मंदिरात कीर्तन महोत्सवाचे तर, प्राधिकरण येथील सुर्यमुखी हनुमान मंदिरात होमहवन तसेच भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येथे शिवसेनेचे संतोष सौंदणकर आणि महावितरणच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
काळभोरनगर येथील श्री हनुमानाच्या ५१ फूट उंचीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी भाविकांना बुंदी लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.