न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली एस.के.एफ कंपनी, चिंचवड येथे मतदान जनजागृती करण्यात आली.
यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच ‘हातभर तक्रारी, बोटभर उपाय’, ‘आपले मत आपला हक्क, चला मतदान करूया’, असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला कंपनीचे एचआर मॅनेजर अनंत देवकाते, सचिन अडसुळ, किशोर कदम, अक्षय येडे, मंजूनाथ करकेट्टी, बापू पाटील व इतर कर्मचारी तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते.
विविध प्रकारची घोषवाक्ये यामार्फत जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.