- मुलासमोरच आई रक्ताच्या थारोळ्यात; सीटी प्राईड स्कुलजवळील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- ओला इलेक्ट्रीक स्कुटीवरुन राहत्या घरुन मुलाला शाळेमध्ये सोडण्यासाठी फिर्यादी यांची ३० वर्षीय मामे बहिण जात होती. दरम्यान रस्त्यात टाटा कंपनीच्या ट्रकवरील चालकाने वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे, हायगईने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवले. फिर्यादीच्या मामे बहिनीच्या इलेक्ट्रीक स्कुटीला धडक दिली. आरोपी चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता वाहन सोडुन पळुन गेला. अपघातात त्यांच्या मामे बहिनीस व भाच्यास गंभीर दुखापत करुन व मामे बहिण हिच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
हा प्रकार (दि. २४) रोजी सकाळी ८.५० वा. रामकृष्ण हरि चौक, सीटी प्राईड स्कुल जवळ, देहु आळंदी रोड, चिखलीतील सीग्नलजवळ घडला. फिर्यादी वैभव भानुदास आगरकर यांनी आरोपी टाटा ट्रक (नं. एम. एच. १२.एल.टी. ९९०७) यावरील चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २४३/२०२४ भादवी कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), मोटर वाहन कायदा कलम १८४, १३२(१) (क), ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक तपास करत आहेत.