न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- कच्च्या सर्विस रोडवर २४ वर्षीय फिर्यादी तरुण व्हेस्पा गाडी घेवुन थांबला होता. दरम्यान पुणे-नाशिक रस्त्याने आलेल्या पीएमपीएमएल बसवरील चालक त्याची बस खेडकडे नेत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी पीएमपीएमएल बस चालकास हाताचा इशारा करुन बस थांबवण्यास सांगितले. बस चालकाने बस तशीच पुढे आणली. त्यामुळे बसच्या पुढील बाजुची धडक फिर्यादी तरुणाच्या गाडीच्या पुढील चाकाजवळ बसली. त्यामुळे गाडी तरुणाच्या डाव्या पायावर पडली.
यात तरुणाच्या डाव्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोटास मार लागला. पुढील चाकवरील मरगाड, शो हेडलाईट चेंबुन दबुन फुटुन नुकसान झाले आहे. अपघातानंतर पीएमपीएमएल बस चालकाने तरूणाला ‘गाडी उचला’ असं म्हणत तरुणाला शिवीगाळ केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २४) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास चाकण येथील महालक्ष्मी स्टील दुकानासमोर, पुणे नाशिक सर्विस रोड येथे घडला. फिर्यादी प्रधुम्न संजय गोरे (वय २४ वर्षे) याने प्रविण दत्तु तांबे (वय २९ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलिसांनी २७८/२०२४ भादवि का क २७९, ३३७, ४२७, ५०४ मो व्ही अँक्ट कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. म. पो. हवा. सोनवणे पुढील तपास करीत आहेत.