- सांगवी पोलीसांकडून स्थानिक नागरिकांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- पिंपळे निलख येथील प्रवाहीत मुळा नदी पाञामध्ये आरोपी यांनी बांधकाम राडारोडा, दगड, कचरा माती टाकली. त्यामुळे नदी प्रदूषण झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ”नद्यांचे जल प्रदुषण करुन नका” या पर्यावरण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केले. नदीपात्रात टाकण्यात आलेल्या बांधकाम राडारोडामुळे भविष्यामध्ये संभाव्य पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढलेली आहे. या पुरामुळे पिंपरी चिंचवड शहरात पुरस्थिती उद्भवून धोका निर्माण होवू शकतो.
हा प्रकार (दि.२७/०३/२०२४) रोजी पिंपळे निलख येथील सी.एन.जी पेट्रोल पंपामागिल मुळा नदीपाञामध्ये घडला. स्वप्निल मनोहर पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.
आरोपी १) हरिभाऊ काळुराम साठे (वय ६२ वर्ष रा. पिंपळे निलख), २) ज्ञानोबा काळुराम साठे (वय ६५ वर्ष), ३) अमोल बबन साठे (वय ५५ वर्ष), ४) लक्ष्मण कोंडिबा कामठे (वय ६० वर्ष), ५) सुभाष कोंडिबा कामठे (वय ५८ वर्ष), ६) सुभाष कोंडिबा कामठे (वय ६१ वर्ष) यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात १७३/२०२४ भादवि २७१, २७७ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि गावंडे पुढील तपास करीत आहेत.