न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- भावाचा खून करणाऱ्या आरोपीच्या मित्राचे अपहरण करुन बदला घेण्याच्या इरादयाने त्याचा निर्घण खून करुन, मृतदेह वापी (गुजरात) येथे जाळून विल्हेवाट लावणारा मुख्य सुत्रधार राहुल पवार यास गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
सविस्तर हकीकत अशी, आदित्य युवराज भांगरे (वय १८ वर्ष रा. रा. भांगरेवस्ती, द्वारका सिटी जवळ, महाळुंगे इंगळे, ता खेड) याची मैत्री महाळुंगे गावातील शंभु भोसले नावाच्या मुलासोबत होती. १ शंभु भोसले, २. अभि जावळे, ३. वैभव आंधळे, ४. विनोद बटलवार, ५. शेखर नाटक, ६. छोटा साकेत यांनी रितेश संजय पवार (रा. हिताची कंपनीसमोर, पॅराडाईज हॉटेलमागे, महाळुंगे (इंगळे) याचा खून केला होता. त्याबाबत महाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा ७८२/२०२३, भा.द.वि.क.३०२,३०७, १४३, १४६,१४८,१४९, भा.ह.का. क.४,२५, सह क्रिमिनल लॉ अमेटमेंट मधील कलम ७ प्रमाणे नोंद करण्यात येवून दाखल गुन्हयात आरोर्पीना अटक करण्यात आलेली असून सध्या आरोपी हे न्यायालयीन कस्टडीत येरवडा कारागृहात आहेत.
मयत रितेश पवार याचा भाऊ राहुल संजय पवार हा, शंभु भोसले व त्याच्या मित्रांना सोडणार नाही, त्यांचा बदला घेणार असे म्हणत होता. दरम्यान त्या खूना संदर्भातील वादग्रस्त पोस्ट आदित्य भांगरे याने इंस्टाग्रामवर लाईक व शेअर केल्याने मयत रितेश पवार याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मयत रितेश संजय पवार याचा भाऊ राहुल संजय पवार याने व त्याच्या साथीदारांनी दिनांक १६/०३/२०२४ रोजी आदित्य युवराज भांगरे, वय १८ वर्षे अपहरण केले. महाळुंगे पोलीस स्टेशन येथे मिसिंग नं. ६२/२०२४ प्रमाणे नोंद करण्यात आलेली आहे. दि.१८/०३/२०२४ रोजी रात्रौ १०:३० च्या सुमारास राहुल संजय पवार याने त्याचे ०२ साथीदारासह एका मोटार सायकलवर येवून रासे ता. खेड, जि. पुणे येथे शिक्रापुर रोडवर असलेल्या मराठा हॉटेलचे मालक स्वप्निल ऊर्फ सोप्या सजय शिंदे रा. रासे, ता. खेड, जि. पुणे याचेवर त्याचे हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलाने गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१९२/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्हयातील आरोपी नामे अमर शिंदे याचेकडे तपास करता राहुल पवार व त्याचे साथीदाराने अपहृत आदित्य भांगरे यास जिवे मारुन त्यास वापी, गुजरात येथे नेऊन त्यास जाळले असले बाबत माहीती दिल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता आदित्य भांगरे याची मयत बॉडी मिळुन आलेने महाळुंगे पोलीस स्टेशन मानव मिसिंग नंबर ६२/२०२४ वरुन गुन्हा नोंद क्र. १६४/२०२४.भा.द.वि.क. ३६४,३०२,२०१,१२० (ब),२१२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii).३(४).३ (४) (मोका) असे कलम वाढ करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल संजय पवार याचेवर सन २०१३ पासून शरीराविरुध्दचे एकुण ०७ गुन्हे दाखल असून तो दाखल गुन्हा केल्यापासून परागंदा झालेला होता, तो त्याचे अस्तित्व लपविण्यासाठी मोबाईलचा वापर टाळत होता, त्याने त्याचे डोक्यावरील केस व दाढी मिशा काढलेल्या असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते, त्याचे संपर्कातील एकुण ६७ लोकांकडे चौकशी करण्यात आलेली होती, तसेच तो वावरत असलेल्या ठिकाणी नाशिकफाटा कासारवाडी पुणे भागातील दुकाणे, चौक व मेट्रो स्टेशनचे एकुण १२४ सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करण्यात आली होती. दि.२२/०४/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मुख्य आरोपी राहुल संजय पवार हा औध परीसरात येणार असले बाबत मिळालेल्या माहीतीवरुन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता सदरचा आरोपी हा रिक्षामध्ये येवून थांबला, त्यास घेराव घालुन योग्य त्या पोलीस बळाचा वापर करुन ताब्यात घेतले परंतु सदर इसमाने त्याचा पेहराव व ओळख बदलली असल्याने तो त्याचे नाव सागर संजय मोरे रा. आळंदी, पुणे असे खोटे नाव सांगत होता. त्याचेकडे सखोल व कौशल्यपूर्वक तपास करुन तो राहुल संजय पवार, वय ३४ वर्षे, रा. हिताची कंपनीसमोर, पॅराडाईज हॉटेलमागे, महाळुंगे (इंगळे), ता. खेड, जि. पुणे निष्पन्न झालेने पुढील कारवाई करीता त्यास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग, पिंपरी चिंचवड यांचेसमक्ष हजर केले असता त्यास मा. कोर्टात हजर करुन तपासकामी दि.०४/०५/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे.