- केबिन व स्टेरिंगमध्ये अडकलेल्या वाहनचालकाची अखेर सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२४) :- पिंपरीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरीतील मोरवाडी चौकातील सिटी वन मॉल समोरील रस्त्यावर शनिवारी (दि. २७) रोजी पहाटे २.३५ च्या सुमारास टँकरचा अपघात झाला. अपघातात वाहन चालक केबिन व स्टेरिंगमध्ये अडकल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.
घटनास्थळी पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राचे जवान हजर झाले. जवानांनी त्वरित सर्कुलर सॉं, स्प्रेडर, क्रोबार, रोप ,रेस्क्यू बेल्ट इत्यादीच्या साह्याने अडकलेल्या वाहन चालकाची सुखरूप सुटका केली. रुग्णवाहिकेच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन चालक अंकुश मस्के (वय वर्ष 46) यांना उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलकडे रवाना केले. तसेच रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या बचावकार्यात विकास नाईक (लि फा), प्रतीक कांबळे, अमोल चिपळूणकर, अर्जुन जाधव, अभिषेक भांगे, कुटे, कंठाळे आणि इतर कर्मचारी कार्यरत होते.