न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२४) :- नवऱ्याचे मागे लागुन त्यांना वारंवार फोन करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याने तिला समजावण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी महिलेने त्यांना शिवीगाळ करुन हातातील पाण्याची स्टिलची बाटली डोक्यात मारली.
मानेच्या मागे चावा घेवुन दुखापत केली. शरिरावर ठिक-ठीकाणी नखे मारुन ओरखडले आहे. फिर्यादीचे मणी मंगळसुत्र तोडुन फिर्यादीच्या कारची मागील खाच फोडुन नुकसान केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १७) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास टीसीएस कंपनीच्या बाजुला, हिंजवडी फेज ३ येथे घडला.
महीला फिर्यादीने आरोपी महीलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ५६०/२०२४ भादवि कलम ३२४,३२३, ४२७,५०४ प्रमाणे आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि धुमाळ पुढील तपास करीत आहेत.