- वाकडमध्ये तेवीस वर्षीय तरुणाकडे आढळला गावठी कट्टा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- पोलीस आयुक्तांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले. कब्जामध्ये २५००० रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा असे अग्नीशस्त्र विनापरवाना बेकायदेशीररित्या अनाधिकारने जवळ बाळगले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट ४ ला याची माहिती मिळताच त्यांनी (दि. २९) रोजी सायंकाळी ६:३० वा.चे सुमारास काळाखडक झोपडपट्टी, वाकड येथील मोकळया जागेत कारवाई करून तेजस रेवण जगताप (वय २३ वर्षे रा. आण्णाभाऊ साठे कमान शेजारी, काळाखडक, वाकड) याला ताब्यात घेतले.
वाकड पोलिसांनी ५४२/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.