न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन सार्वजनिक ठिकाणी ३५,००० रु किं चा एक लोखंडी गावठी कटटा व ५०० रु किं चे एक जीवंत काडतुस आरोपी रिक्षाचालकाने स्वतःजवळ बाळगले.
पोलिसांनी (दि.०४) रोजी साय ७.२० च्या सुमारास ओमसाई गॅरेजजवळ, जुने बांधकाम थांबलेल्या इमारती जवळ, ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे कारवाई केली.मोहमद महेबुब कोरबु (वय-२७ वर्षे, व्यवसाय-रिक्षाचालक, रा. ओटास्कीम निगडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निगडी पोलिसांनी २३०/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहा पोलीस निरीक्षक अमरिष देशमुख तपास करीत आहेत.