न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- व्हॉट्सअॅप कॉल येवु लागले व आमच्या मोतीलाल ओसवाल कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणुक करा, आम्ही तुम्हाला दरदिवशी १० ते २० टक्के रिटर्न देवु असे सांगत होते. त्यानंतर व्हॉट्सअॅप वर एक लिंक आली. या लिंकवरुन एक अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. अॅपमधील अकाऊंट नंबरवर पैसे पाठवण्यास सांगितले. अॅप मधील बँकेच्या अकाऊंटवर पैसे पाठवण्यास सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीच्या अकाऊंट नंबरवरुन ५०,०००/-रुपये, ४,००,०००/- रुपये, त्यानंतर १०,००,०००/- रुपये पाठवले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या नकळत त्यांच्या पत्नीच्या अकाऊंटवरुन तसेच फिर्यादी यांच्या खात्या वरून पंधरा वेळा ट्रान्ॲक्शन होवुन एकूण ९९,००,०१७/- रुपये (नव्यानव लाख सतरा रुपये फक्त) अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय काढून घेवुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली, असं फिर्यादीत म्हंटले आहे. हा प्रकार (दि.२२/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४) दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी रहाटणी) येथे घडला.
फिर्यादी (वय ४५ वर्ष) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५६०/२०२४ भा.द.वि.कलम ४०६, ४१९, ४२० सह माहिती तत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६सी, ६६डी, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पी. आर. शिकलगार, सहा पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.