- गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- विशेष न्यायालय, मोक्का कोर्ट, शिवाजीनगर, पुणे यांनी २९ वर्षीय आरोपीला संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे. तरीही आदेश रद्द किंवा निवास्थानी येण्याची परवानगी न घेता जाणूनबुजुन त्याने आदेशाचे उल्लंघन केले आहे.
तसेच मोकळ्या मैदानात ४०,००० रु किं चा ०१ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व २,००० रु किं चे ०२ जिवंत काडतुसे (पितळी राऊंड) असे एकुण ४२,००० रु किं चा ऐवज अनाधिकाराने, विनापरवाना, बेकायदेशीर जवळ बाळगला असताना पोलिसांना मिळून आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिसांनी (दि. ०४) रोजी सायंकाळी ७:३० वाजता चे सुमारास शिवाजी विद्यालया जवळील, गारुडीवस्ती, गांधीनगर, देहूरोड येथील मोकळ्या मैदानात केली.
बुग्गी ऊर्फ मोबिन सलीम शेख (वय २९ वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ गारुडी वस्ती गांधीनगर देहुरोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. देहुरोड पोलीस ठाण्यात २५३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा पो का. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा विधाते तपास करीत आहेत.