न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- व्यवसायाच्या जुन्या वादातुन आरोपीने महिला फिर्यादी यांच्या डोक्यात उजव्या हाताच्या दंडावर व अंगठ्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
ही घटना (दि. ०५) रोजी ५.०० वा. सुमा. झुलेलाल मंदिराजवळ, मेन मार्केट, पिंपरी येथे घडली. महीला फिर्यादी यांनी आरोपी नारायण देवासी (वय २८ वर्षे, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४२९/२०२४ भा.द.वि कलम ३२४,५०४ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा बांबरसे तपास करीत आहेत.