न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- पिंपरी न्यायालयात सहा अधिक्षक या पदावर फिर्यादी हे काम करतात. दरम्यान आरोपीने न्यायालयात जामिनदार म्हणुन सादर केलेली कागदपत्रे ही त्याच्या नावाची नसल्याचे फिर्यादी यांच्या पडताळणीत आढळुन आले.
त्याने न्यायालयाची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र मारुती चव्हाण यांनी आरोपी आकाश अशोक कांबळे (वय ३० वर्षे रा. चिखली रोड, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४३४/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.