- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची पिंपळे निलखमध्ये आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- ‘लग्नात तुझ्या आई वडिलांनी मानपान केलेला नसुन आम्हाला हुंडा पण दिलेला नाही. तसेच तु पांढ-या पायाची असुन, तु करणी धरणी केल्यामुळेच वडिल मयत झाले. तु नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करते, अशा कारणावरुन आरोपी यांनी फिर्यादीच्या ३६ वर्षीय बहिणीचा वेळोवेळी मानसीक व शारीरीक छळ करुन तिला उपाशी पोटी ठेवत तीला आरोपी क्र १ याने मारहाण केली.
तिला जीवन जगण्यास नको केल्याने तीने स्वतः गळफास घेतला. आरोपी यांनी तीला आत्महत्यास प्रवृत्त केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०४/०२/२०१४ पासुन वेळोवेळी ते दि.०६/०५/२०२४) गुलमोहर कॉलनी, विशाल नगर, पिंपळे निलख येथे घडला.
फिर्यादी रविंद्र बाळकृष्ण लंगोटे (वय ३९ वर्षे, रा. खामगाव जि. बुलढाणा) यांनी आरोपी १) पती विशाल अशोक जवळेकर २) महिला आरोपी ३) दिर निखिल अशोक जवळेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी २०१/२०२४ भा.दं.वि कलम ४९८ (अ), ३०६,३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे. पोउपनि भालेराव पुढील तपास करीत आहेत.