न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- पान टपरी बंद करुन फिर्यादी यांचा ४१ वर्षीय अपंग मेव्हणा अपंग व्यक्तीसाठी बनविलेल्या अॅक्टीवा या गाडीवरुन घरी जात होता. त्यावेळी पाठीमागुन आलेल्या ट्रक (डी एल ०१ एम ए ७२४२) वरील चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने, हयगईने चालवून अॅक्टीवा गाडीला जोरदार धडक दिली.
धडकेत फिर्यादीचा मेव्हण्याला गंभीर दुखापत करुन ट्रक वरील वाहनचालक त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे. तसेच त्यास हॉस्पीटल येथे उपचारसाठी न नेता व अपघाताची खबर पोलीसांना न कळविता तेथून पळुन गेला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.०७) रोजी रात्री ११.०० च्या सुमारास टिळक चौक, पवळे ब्रीज, निगडी येथे घडली.
फिर्यादी प्रभाकर बलभीम सुभेदार (वय ४५ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा. वाल्हेकरवाडी) यांनी आरोपी सुरेंदर चगंदर भान (वय ३५ वर्षे रा. हरियाणा) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
निगडी पोलिसांनी २३८/२०२४ भा. द. वि कलम २७९,३०४ (अ) मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७, १३२ (१) क प्रमाणे आरोपी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सातपुते पुढील तपास करीत आहेत.