न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- पुण्यातील रामनगरमध्ये हवेत गोळीबार करीत दशहत निर्माण करणा-या मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने शिताफीने अटक केली आहे. सिध्दाप्पा मलिकार्जुन यळसंगीकर (वय ३५ रा. वळसंगी ता. आळंद जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक; सध्या राहणार सदगुरु हॉटेल कोथरुड डेपो पुणे) अस अटक आरोपीचे नाव आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिटी प्राईड हॉटेल येथे (दि. ०८) पोलिसांनी कारवाई केली. कमेरला पिस्टल सारखे हत्यार लावुन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी हॉटेल सिटी प्राईड परीसरात सापळा लावला. शोध घेत असतांना संशयित आरोपी हा सिटी प्राईड हॉटेलचे ठिकाणी थांबला असलेला दिसुन आला. त्याचवेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्याने कमरेचे पिस्टल काढुन फायरिंग करण्याच्या व उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यास झडप घालुन अत्यंत धाडसाने व शिताफीने पकडले. त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल व जिवंत राउंड काढुन घेतले.
दरम्यान (दि. ७) रोजी प्रणव सुपर मार्केट समोर, रामनगर, पुणे येथे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तिघांनी पिस्टलमधुन दोन राउंड हवेत गोळीबार केले व आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर ते सर्व तेथुन पळून गेले. गोळीबार करणारा सिध्दाप्पा वळसंगीकर हा मुळचा यळसंगी ता. आळंद जि. गुलचर्गा राज्य कर्नाटक येथील असुन त्याच्यावर सिंदगी पोलीस स्टेशन येथे दोन खुनाचे गुन्हे नोंद आहेत. सध्या तो जामीनावर सुटला असुन पुणे येथे कामासाठी आला आहे. सिध्दाप्पा यळसंगीकर याने त्याचे साथीदारांसमवेत दहशत निर्माण करणेसाठी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. सदर घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १९३/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) २७ (२), क्रि.लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, भादवि कलम ३४ व मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल आहे. गोळीबार करुन सिध्दाप्पा यळसंगीकर हा पिंपरी परिसरातुन येवून लपुन बसला होता. सिध्दाप्पा यळसंगीकर याने पिस्टल व जिवंत राउंड कोतून आणले व कोणाच्या सांगणेवरुन फायरींग केले याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे.