न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वाकड वाहतूक विभाग हद्दीतील पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन थेरगांव येथे (दि. १२) चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या मतपेटीचे वाटप होणार आहे. या ठीकाणाहून कर्मचा-यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे आणि परत आणणेकरता एकूण १३८ लहान मोठ्या वाहनांची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी तापकीर चौकाकडून थेरगांवकडे येणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
दरम्यान रविवारी (दि. १२) रोजी पहाटे ०५:०० ते सोमवारी (दि. १३) रोजी ००:०० वा. पर्यंत अथवा मतपेट्या जमा होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील तसेच निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेली वाहने वगळून) आवश्यकतेनुसार वाकड वाहतुक विभाग अंतर्गत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागरीकांनी या कालावधीत दिलेल्या पर्याची मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
असा असेल वाहतुकीत बदल…
१) तापकीर चौक येथुन थेरगांवकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्याची मार्ग :- या मार्गावरील वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) थेरगांव पोलीस चौकी येथून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग :- या मार्गावरील वाहने थेरगांव पोलीस चौकी येथुन उजवीकडे वळून पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील.
३) माध्यमीक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी.
पर्यायी मार्ग :- या मार्गावरील वाहने माध्यमिक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या रोडने इच्छित स्थळी जातील.