न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- चारचाकी हातगाडीवर गॅस शेगडी व गॅस स्टो ठेवुन व हातगाडीच्या खाली गॅस सिलेंडर ठेवुन हातगाडीवर साहित्य मांडुन त्यावर मसाला डोसा, उताप्पा वगैर खादयपदार्थची हातगाडी भोवती उभ्या असलेल्या ग्राहकांना विक्री करीत होता.
हातगाडी ही फुटपाथवर लोकांना जाणे येणेसाठी अडथळा होईल अशा रितिने लावली होती. त्याने गॅस सिलेंडर हा ज्वालाग्राही वस्तु बाळगल्याने मानवी जिवीत धोक्यात येईल व अन्य कोणात्याही व्यक्तीला दुखापत व आगशती पोचवण्याचा संभव आहे, याची जाणीव असताना लोकांच्या गर्दीमध्ये गॅस सिलेंडर हा ज्वालाग्राही वस्तु वापरत व हाताळताना मिळुन आला. हा प्रकार (दि.०९) रोजी दुपारी १२.०५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा चौक ते नेहरुनगर कडे जाणारे रोडचे कडेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या भितीस लागुन पिंपरी गावाच्या हद्दीत फुटपाथावर, पिंपरी येथे घडला.
१) विष्णुपोलाप्पा सोनेपोगुल (वय ३१ वर्षे रा. गाधीनगर हनुमान मंदीराजवळ पिंपरी), २) हातगाडा मालक प्रविण रामभाऊ कांबळे (वय ४४ वर्षे रा. गाधी नगर पिंपरी) ३) हात गाडा चालक महेश कुमार पुलपांडे तेवर (वय २४ वर्षे रा. कन्नड गल्ली गांधीनगर पिंपरी) पुणे (हात गाडाचालक) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४४३/२०२४ भा.दं.वि कलम २८५,३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा भोते तपास करीत आहेत.