न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- होंडा कंपनीचे एकुण ३,४९,७४१ रुपये किंमतीचे बनावट स्पेअर पार्टस व होंडा नावाचे प्लॅस्टिक स्टिकर पाऊच हे गाळ्यामध्ये विक्रीसाठी ठेवत ते ओरीजनल असल्याचे भासवुन ग्राहक व कंपनीची फसवणुक केली.
दरम्यान त्याची विक्री करीत असताना आरोपी निदर्शनास आला. हा प्रकार (दि.०९) रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास क्रांतिवीर नगर, थेरगाव येथे घडला. फिर्यादी रेवननाथ विष्णु केकान (वय-४१ वर्षे) यांनी आरोपी गोविंद वनाराम सिरवी (वय ३० वर्षे, धंदा व्यापार, रा. काळेवाडी; मुळ रा. खार्ची, ता. मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५९०/२०२४ भा.दं.वि कलम ४२०, कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चव्हाण पुढील तपास करीत आहेत.