न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली फसवणुक करणा-याला मिरा भाईंदर ठाणे येथुन सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सांगवीत राहणाऱ्या तक्रारदाराला आरोपीने व्हॉटस्अप मोबाईलवरुन एजन्सीची भरती आहे. घरातून पार्ट टाईम जॉब करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी संपर्क केला होता.
‘आमची कंपनी रेस्टॉरेट आणी हॉटेलचा बिझनेस वाढविण्यासाठी जाहीरात करत आहे त्यामध्ये आपल्याला घर बसल्या आमची मदत करता येईल त्याबदल्यात आपल्याला मोबदला देण्यात येईल’, असे सांगुन फिर्यादी यांच्या हॉट्सअप वर लिंक पाठवली होती. ती लिंक ओपन करुन त्यातील टास्क लाईक आणि शेअर करण्यास सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरवातीला ५००० रुपये गुंतवणुक करुन त्याबदल्यात ६५०० रुपये फिर्यादीला परतावा दिला होता. अशा प्रकारे फिर्यादी यांना वेळोवळी वेगवेगळे टास्क व लिंक पाठवुन BTC USDT या मध्ये गुतंवणुक करण्यास भाग पाडले. अधिकचा परतावा न देता फिर्यादी यांची एकुण ३२,९२.५६३ रुपयाची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.
याबबत फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याबाबत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करून जैईद जाकिर खान (वय २० वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. मु.पो. फ्लॅट नं १०२, सारुपी कावेरी हौ. सो. नयानगर मिरा भाईंदर) याला गुन्हयात सहभाग असल्याने अटक केली. त्याच्याकडुन ०१ मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात तक्रारदार यांनी आरोपीच्या बँक खात्यावर पैसे भरलेले आहेत. अकाऊंटची माहीती घेतली असता त्या अकाऊंटला एकूण १८,००,००० रुपये पेक्षा जास्त रक्कमेचे ट्रान्झेक्शन झाले असल्याची प्राथमिक माहीती प्राप्त झालेली आहे. तसेच अटक आरोपीविरुद्ध भारतातील इतर राज्यात ०२ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तसेच सदर आरोपीने इतर ओळखीच्या नावाने अकाऊंट काढून दिले आहेत.