न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- वीज वाहिनीच्या जोडणीचे शासकीय काम करत असताना तिघांनी मिळून वीज कर्मचारी (वरीष्ठ आणि कनिष्ट तंत्रज्ञ) यांना लाईट का घालविली या कारणावरुन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यातील आरोपी १ याने शासकीय कर्मचारी दोघांना हाताने मारहाण केली.
हा प्रकार (दि. १०) रोजी दुपारी ३.०० ते ३.३० वाजेपर्यंत, कुंभारवाडा, जुनी सांगवी येथे घडला. रत्नदीप मनोहरराव काळे (वय ३९ वर्षे) यांनी आरोपी १) वैभव गवारे, त्यांचे वडील व त्यांचा एक मित्र (रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात फिर्याद नोदविली आहे.
सांगवी पोलिसांनी २०४/२०१४ भादवि कलम ३५३,३२३,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. पोउपनि कदम पुढील तपास करीत आहेत.


















