न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टोळक्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्याने तसेच लोखंडी कोयत्याने व सिमेंटच्या गटुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांनी लोखंडी कोयते हवेत फिरवत मोठ्याने आरडाओरडा करुन समाजामध्ये दहशत निर्माण केली आहे. ही घटना (दि.०९) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास बापुजीबुवा गार्डन, थेरगाव व गार्डनच्या बाहेर रोडवर घडली.
अल्पवयीन मुलगा (वय १७ वर्षे रा. थेरगाव) याने आरोपी १) शिवा कांबळे (वय २४ वर्षे अंदाजे, रा. पडवळनगर थेरगाव), २) विशाल गायकवाड (वय २२ वर्षे रा. पडवळनगर थेरगाव), ३) आकाश राजु आरकेरी (वय १८ वर्षे अंदाजे, रा. पडवळनगर थेरगाव), ४) विधीसंघर्षित बालक (वय ११ वर्षे रा. थेरगाव), ५) प्रविण वसंत डोमनाळ (वय २० वर्षे रा. पडवळनगर थेरगाव) तसेच त्यांच्या सोबत दोन ते तीन अनोळखी मुले यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५९२/२०२४ भा.दं.वि कलम ३२६,३२४, ३२३,५०४, १४१,१४३, १४७,१४९, ३४ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमिडमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. ५ याला अटक केली आहे. पोउपनि नाईक निंबाळकर तपास करीत आहेत.












