न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- स्क्रॅप मटेरीयल भरून ट्रक कंपनीच्या गेटच्या बाहेर जात असताना दोघांनी गाडी आडवली. ‘तु कंपनीमधील स्क्रॅप मटेरीयल घेवुन जायचे नाही’ असा दम चालकाला दिला. ट्रकमधील मटेरीयल गाडीमध्ये भरून घेवुन जात असताना दोघांनी ट्रक आडवुन ‘तुला कालच सांगीतले आहे की कंपनीमधील स्क्रॅप ट्रकमध्ये घेवुन जायचे नाही’ असे बोलुन शिवीगाळ केली.
‘जर तु गाडी कंपनीच्या बाहेर काढली तर, तुझी गाडी जाळुन टाकीन व तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देवुन ट्रकचा व्यवसाय करण्यास मज्जाव केला. हा प्रकार (दि. १०) रोजी सकाळी ०९.३० वा. सुमारास कुरुळीतील दाना आनंद कंपनी, स्पायसर चौक गेट समोर घडला.
याप्रकरणी आदित्य आष्टभुजा पांडे (वय २८ वर्ष, धंदा ट्रक चालक, रा. गंगानगर आकुर्डी) यांनी आरोपी १) धनंजय धोंडीबा मावळे (वय २९ वर्ष, चिखली), २) स्वपनील चंद्रकांत वंजारी (वय ३१ वर्ष गहुंजे ता. मावळ जि.पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
महाळुंगे एमआयडीसी २९८/२०२४ भा.द.वी. कलम ३४१, ५०४, ५०६, ३४ सह क्रिमीनल लॉ अॅमॅन्डमेंट १९३२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि थेउरकर पुढील तपास करीत आहेत.












