न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- कुदळवाडी, चिखलीतील रेहान इंटरप्रायजेस या कंपनीने तीचे रसायन मिश्रीत पाणी हे नाल्यावाटे नदीपात्रात सोडले. त्यामुळे मनुष्यहानी, नदीतील जैवविवीधता तसेच परीसरातील सजीवांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करुन पर्यावरणाची हानी केली आहे.
हा प्रकार (दि.०८) रोजी सायंकाळी ५.०० वा सुमारास घडला. महापालिकेचे अमोल गणपत गोरखे यांनी याप्रकरणी अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान (वय-३४ वर्षे रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २८०/२०२४ भा.द.वि.२७८महा. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६चे कलम १५ महाराष्ट्र ठि. महानगरपालिका अधिनियम ३७६ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहवा पिंगळे पुढील तपास करीत आहेत.












