न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग करीत २३ वर्षीय तरुणाने बेकायदा बिगरपरवाना एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस स्वतः जवळ ठेवले.
याप्रकरणी (दि. ११) रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास जगताप डेअरी चौक ते कस्पटे चौकाकडे जाणाऱ्या रोडवर, एशियन फर्निचरसमोर, वाकड येथून तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०,००० रु किं चे ०१ पिस्तुल व २००० रु किं चा ०१ जिवंत काडतुस असा एकुण ५२,००० रु किं चे अग्निशस्त्र जप्त केले आहेत.
वाकड पोलिसांनी तरुणावर ५९७/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चव्हाण तपास करीत आहेत.











