- पिस्टलमधून तीन राउंड झाडून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- १९ वर्षीय तरुणाला दुकानासमोर येवून ‘मला बोलायचे आहे, आमच्यासोबत चल’ असे म्हणत तिघांनी नेले. सात महिन्यापुर्वी झालेल्या वादाच्या कारणाचा राग मनात धरून त्याला हाताने मारहाण केली.
अचानक आरोपी क्र. १ याने ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलमधून तरुणावर ३ गोळ्या झाडून त्याला जखमी केले. हा प्रकार (दि. १२) रोजी सायंकाळी ६०० च्या सुमारास छञपती उद्यानाजवळ, पंतनगर रोड, जाधवाडी, चिखली येथे रोडवर घडला.
अजय सुनिल फुले (वय १९ वर्ष व्यवसाय गॅस स्टोव्ह रिपेअरींग, रा. मोहननगर, चिंचवड) याने आरोपी १) हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली), २) शामलिंग चौधरी (रा. मोशी डी मार्टसमोर, मोशी), ३) किर्तीकुमार लिलारे (पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २८२/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,३२३, ५०४,३४आर्म अॅक्ट ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी क्र २ ताब्यात आहे व आरोपी क्र ३ हा जखमी असुन हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे. पोउपनि मुळीक तपास करीत आहेत.











