न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- महायुतीचे उमेदवार यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवारांना वाहनावर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई आहे, असताना देखील मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे गाडीवर त्यांचे ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचा दावा करत तक्रार करण्यात आली आहे.
हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड-उघड भंग आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.











