न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने आज (१३ मे) रोजी इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल जाहीर केला आहे. आज सकाळी सुरुवातीला १२ वीचा निकाल घोषित करण्यात आला व आता त्यापाठोपाठ CBSE इयत्ता १ ० वीचा निकाल सुद्धा जाहीर केला आहे.
इयत्ता १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in, सह results.digilocker.gov.in आणि umang.gov.in. या ठिकाणी सुद्धा आपला निकाल तपासू शकतात. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि ॲडमिट कार्ड आयडी टाकून सीबीएसई दहावीचा निकाल तपासू शकतात.
प्राप्त माहितीनुसार, यंदा १२ वी प्रमाणेच इयत्ता १० वीच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी सुद्धा वाढली आहे. २०२४ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ६० इतकी नोंदवली आहे जी मागील वर्षीच्या ९३. १२ टक्के इतकी होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही त्रिवेंद्रम दहावीच्या निकालात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा ठरला आहे.











