न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- संगनमताने महिलेला लिंक पाठवली. वेगवेगळ्या व्हॉटसअप ग्रुपवर जॉईन करून Globeciss.pro या अॅपवर अकाऊंट सुरु करण्यास महिलेला भाग पाडले. त्यावर महिलेला शेअर मार्केटच्या वेगवेगळया कंपन्याच्या स्टॉकबाबत माहीती देत चांगला फायदा असल्याचे अमीष दाखवले. तसेच त्यांना चांगला फायदा मिळत असल्याचे अॅपवर दाखवले. आरोपी यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या अकाऊंटवर एकुण २९,३८,३०१ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आयपीओची लॉटरी लागली असल्याचे सांगून आणखी ३८ लाख रुपये भरल्यास अकाऊंट अनफ्रिज करण्यात येईल, असे सांगितले. महिलेने रक्कम भरु शकत नसल्याची व भरलेली रक्कम परत करण्याची त्यांना वारंवार विनंती केली. तरीही आरोपींनी महिलेचे अकाऊंट अनफ्रिज न करता भरलेली रक्कम परत न करता, रक्कमेचा अपहार करुन महिलेची फसवणुक केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.३१/०३/२०२४ ते दि.०८/०५/२०२४) दरम्यान रॉयल कोर्ट अपार्टमेंट, डांगे चौक, थेरगांव येथे घडला. याप्रकरणी महीला फिर्यादी यांनी आरोपी १) ट्रेसी मोबाईल क. ००१३६५७८०७४१६, व्हॉट्सअप मोबाईल नं.९९३७३०४१४६,८५२४०९२५५८, ९४८१४८५९४९, ८२७७६४१९०८, ८७६२१४४२०८ धारक, २) व्हॉटसअप ग्रुप २८-Vanguard Group, Globe Capital-M58, Globe Capital-M58, M58-Globe Capital Customer Care ग्रुप अॅडमीन धारक, ३) Globeclss.pro अॅप अकाउंड नंबर धारक व तपासात निष्पन्न होणारे अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ६१२/२०२४, भा.दं.वि. कलम ४१९, ४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोनि नाळे पुढील तपास करीत आहेत.











