न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- ‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत, तुमच्याकडे गांजा आहे. तुम्ही गांजाची विक्री करता, तुमच्या खीशामध्ये गांजा आहे, तुमच्या खिशातील सर्व साहीत्य बाहेर काढा’ असे म्हणाले. त्यामुळे घाबरून तरुणाने खिशातील सर्व साहीत्य बाहेर काढले.
त्यामध्ये १३,००० रुपये, आधार कार्ड व पॅनकार्ड तसेच तरुणाचा मित्र याच्याकडे १०,००० व आणखी एकाकडे १०,००० रुपये असे पैसे व साहीत्य होते. रोख रक्कम एकुण ३३,००० रुपये व आधार कार्ड घेवुन आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
हा प्रकार (दि ०६) रोजी दुपारी ४.०० च्या सुमारास तरुण त्याच्या दोन मित्रांसह रिक्षाने कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी नेपाळी मार्केट, पिंपरी पुलाजवळ घडला. फिर्यादी सोहेल गुलफाम खान (वय २३ वर्षे) याने आरोपी दोन अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४५९/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०,१७० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भांडवलकर पुढील तपास करीत आहेत.











