- पोलीस मुळ मालकांना लवकरच हे फोन देण्याच्या तयारीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सन २०२३ व माहे मार्च २०२४ या दरम्यान बरेच मोबाईल फोन गहाळ झालेबाबत तक्रारी दाखल होत्या. त्याबाबत पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेवुन हस्तगत करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेश दिला होता.
त्या अनुषंगाने संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे व बाळासाहेब कोपनर सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. या पथकास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये गहाळ झालेल्या मोबाईल बाबतच्या तक्रारींची माहिती संकलित करून, पो.अं. प्रविण कांबळे यांच्याकडे देण्याबाबत सांगितले. पो.अं. कांबळे यांनी नमुद मोबाईल फोनबाबत तांत्रिक विश्लेषन विभागाचे पो.अं. माळी व हुलगे यांचेकडुन अद्यावत माहिती प्राप्त केली. त्याचा तांत्रिक दृष्ठया तपास करून, गहाळ झालेले जे मोबाईल फोन अॅक्टिव्ह झालेले आहेत त्याची माहिती संकलीत केली.
तदनंतर दरोडा विरोधी पथकातील अंमलदार यांना अॅक्टिव्ह झालेल्या मोबाईल क्रमांचे नाव व पत्ते देण्यात आले. पथकातील अंमलदार यांनी अॅक्टिव्ह झालेले कि.रु. १०,१४,७००/- चे १० स्मार्ट मोबाईल फोन हे अमरावती, कोल्हापुर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, धाराशिव, सोलापुर इत्यादी जिल्हयातुन हस्तगत करण्यात आले आहेत. स्मार्ट मोबाईल फोन मध्ये आयफोन, वन पल्स, विवो, मोटोरोला, सॅमसंग, रेड मी, नोकिया इत्यादी कंपन्यांचे मोबाईल फोन जमा केले आहेत. दरोडा विरोधी पथकाने मिळुन आलेले ७० स्मार्ट मोबाईल फोन हे त्यांचे मुळ मालकांना वरिष्ठांचे मार्फतीने प्रदान करण्याकरीता कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.











