न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- निगडीतील भक्ती शक्ती उद्यानातील सर्वात उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) फाटला आहे. या उद्यानाला हजारो नागरिक भेट देत असतात. राष्ट्रध्वज फाटल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) बनविण्यासाठी लाखोंचा खर्च केला होता. त्यासाठी खाजगी ठेकेदाराची नेमणूक केली होती. लाखो रुपये खर्चून देखील राष्ट्रध्वज फाटला आहे.
याप्रकरणाची निगडी पोलिसांनी दखल घेत महापालिका आयुक्तांसह ठेकेदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करावा. अन्यथा भक्ती शक्ती उद्यानासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे.











