न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे आज गुरुवारी मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.
रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडलं नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकल नाही. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालं आहे.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला हे होर्डिंग कोसळले. वाहने पार्क केलेली होती. त्यामुळे वाहनामध्ये कोणीही नव्हतं. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेकडून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकलेली नाही.











