- पोलीस आयुक्तांकडून दोन्ही पोलीस अंमलदारांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :-चिंचवडच्या शाहूनगर येथील अरण्यम सोसायटीत (दि. २०) रोजी फ्लॅटला लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये एमआयडीसी भोसरी पोलीसांनी वयोवृदध महिलेचे प्राण वाचविले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करीत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
शाहुनगर येथील एचडीएफसी कॉलनीच्या पाठीमागे एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असुन पोलीस मदत हवी आहे, असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पोशि/२३४१ तानाजी दयानंद बनसोडे व पोशि/२३४० मच्छिंद्र चिंतु टिके हे त्वरीत घटनास्थळी पोहोचले. बिल्डींगच्या दुस-या मजल्यावरील एका फ्लॅट चे खिडक्यांमधुन आगीचे लोट व धुर बाहेर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पोशि/२३४१ बनसोडे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधुन फायर बिग्रेडची व अधिक पोलीस मदतीचे आवश्यकता असल्याचे कळविले. दोन्ही पोलीस अंमलदार यांनी प्रथमतः सोसायटीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅसचे जोडणी असलेले पाईप लाईन कनेक्शन बंद करुन घेतले व त्यानंतर सोसायटीचे बाहेर जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी त्यांना सांगितले सोसायटीचे आत मध्ये लोक आहेत. त्यामुळे पोशि/२३४१ तानाजी दयानंद बनसोडे यांनी त्यांचे सोबतचे पोशि/२३४० मच्छिंद्र चिंतु टिके यांना सोसायटीचे पार्किंग मधील गाड्या व बिल्डींगचे खाली जमलेले लोक यांना गेटचे बाहेर काढण्यास सांगितले व ते स्वतः बिल्डींगचे जिन्याने आग लागलेल्या फ्लॅट मध्ये गेले. तेव्हा सदर फ्लॅट मध्ये पोशि/२३४१ बनसोडे यांना एक वयोवृदध महिला मदतीचे वाट पाहत असल्याचे मिळुन आल्या असता त्यांनी सदर महिलेस खांदयावर उचलुन घेवुन बाहेर पडत असताच तेथे गॅस सिलेंडरची टाकी त्यांना दिसुन आली. गॅस सिलेंडरचे टाकीमुळे स्फोट होवुन आणखी आग मोठया प्रमाणात भडकण्याची शक्यता असल्याने त्यांनी फ्लॅट मधील वृदध महिलेस खांदयावर घेवुन दुस-या हातात गॅस सिलेंडरची टाकी उचलुन घेवुन जिन्याने खाली येवुन पार्किंग मध्ये आणून सोडले.
तेव्हा सोसायटीचे आवारात बिल्डींगमधील खाली आलेल्या रहिवाशी यांनी बिल्डींगमधील काही लोक हे आगीचे भितीने टेरेसवर गेल्याचे सांगितले तेव्हा पोशि/२३४१ बनसोडे यांनी तत्परतेने बिल्डींगचे दुस-या जिन्याने टेरेसवर जावुन तेथे थांबलेल्या रहिवाशांना सुखरुप पणे खाली आणुन सोडले. बिल्डींगचे दुस-या मजल्यावरील फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीचा लोट शेजारील फ्लॅट मध्ये जात असल्याने त्यास आग लागलेली होती व त्या फ्लॅट मध्येही दोन गॅसचे सिलेंडर असल्याची माहिती मिळाल्याने पोशि/२३४१ तानाजी बनसोडे यांनी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे मदतीने सदरचे दोन्ही सिलेंडर जिन्याने खाली आणले त्यामुळे आग आणखी वाढण्याचा मोठा धोका टळला. तेवढयात सदर ठिकाणी पिंपरी चिंचवड मनपाचे अग्निशामक दलाचे गाडया पोहचल्या होत्या.












