न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :- कुरियर बॉय हा काम करत असलेल्या ठिकाणाच्या स्टोअरमध्ये कुरियरचे पार्सल घेवुन जाण्यासाठी आलेला होता. त्यावेळी दोघांनी त्याला दमदाटी केली. फिर्यादीसह एकाला दमदाटी करुन कुरियर बॉयला हाताने मारहान करुन, पार्सल फोडुन त्यातील एअर गन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेला. एअर गनचे बॉक्सचे तुटुन नुकसान झाले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास हब स्पोर्टस इक्विपमेंट्स प्रा. लि., प्रिस्टीन स्क्वेअर, वाकड येथे घडला. फिर्यादी रविंद्र तुकाराम ताठे यांनी आरोपी १) अक्षय उर्फ बाळा लहु शिंदे (वय ३० वर्षे माऊली चौक, वाकड), २) प्रशांत चव्हाण (वय ४० वर्षे रा. उत्कर्ष चौक, वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ६३६/२०२४, भा.दं. वि. कलम ३९२,३२३, ५०६,४२७, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. अतुल जाधव पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.












