न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २१ मे २०२४) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीत प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी येत्या २४ मे रोजी प्लास्टिक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
देहू नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यालयीन अधिक्षक रामराव खरात, आरोग्य निरीक्षक संदीप कुराडे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, देहू नगरपंचायतचे स्वच्छता दूत शिवाजी महाराज मोरे, शिल्पा मापूसकर, व्यापारी संघटनेचे राजेश अग्रवाल, विशाल माळी, निरंजन साकोरे, प्रकाश पाटील, महिला बचत गटाचे रेखा चव्हाण व नंदा घनवट, विविध कार्यकारी सोसायटीचे प्रीतम वारघडे आदी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक वापरावर आळा घालण्याकरिता देहू नगरपंचायतमार्फत फिरते पथक तयार करण्यात आले असून, पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी देहू नगरपंचायत कार्यालय येथून देहू गाव परिसरात प्लास्टिकची अंत्ययात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवेदिता घार्गे यांनी दिली.












