- मोठी दुर्घटना घडल्यास शहरवासियांचे जीवनच धोक्यात..
- पोलिसांना आता आणखी अलर्ट रहावे लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :- लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे वर्तन करून केवळ स्वार्थासाठी पैसे कमविण्याच्या हव्यासाने ज्वालाग्राही पदार्थाबाबत सध्या पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील सर्वत्रच ठिकाणी खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. त्यासाठी सुरक्षिततेची कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. त्यासाठी पुरेसा बंदोबस्तही ठेवला जात नाही. जिवनाआवश्यक वस्तुबाबत शासन व ग्राहकांची संगणमताने फसवणुक केली जात आहे. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी पोलीस सर्रास कारवाई करताना दिसून येत आहेत. तरीही त्यावर अंकुश येत नाही. त्यामुळे पोलिसांना आता आणखी अलर्ट रहावे लागणार आहे.
दरम्यान पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकाच दिवशी सोमवारी (दि. २०) रोजी महाळुंगे एमआयडीसी, रावेत आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यातील दोघांना गजाआड करीत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पहिली कारवाई गुन्हे शाखा युनिट ३ ने सायंकाळी ६.०० वा. सुमा खराबवाडी येथील आंनद पतसंस्थेसमोर कारवाई करून १२,२५० रू.ची एकुण ०५ सिलेंडर टाकी, वजन काटा, गॅस काढण्याचे मशिन असा मुद्देमाल जप्त केला आहे. अमर संतोष नायक (वय १९ वर्षे रा. खराबवाडी; मुळ रा. हिंगोली) याला अटक करून त्याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३१२ / २०२४ भा.दं.वि कलम ४२०,२८५, जिवनावश्यक वस्तुकायदा १९५५ चेकलम ३, ७ सह (पुरवठा अणि वितरणनियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई (दि. २०) रोजी दुपारी १.२० वा. शिवशक्ती मित्र मंडळ चौक, बापदेव महाराज मंदीराजवळ, सिंबोयसेस कॉलेज रोड, किवळेगाव देहुरोड येथील जय भवानी गॅस सर्विस नावाचे दुकानामध्ये केली. आरोपी घरगुती भरलेल्या सिलेंडरमधुन इतर छोटया सिलेंडरमध्ये गॅस काढुन घेत होता. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी कारवाई करत एकुण ४८,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एकुण ०८ घरगुती वापराचे व २३ लहान गॅस सिलेंडर, गॅस रिफिल करण्याचे साहित्य जप्त केले. विष्णुकांत श्रीधर मोरे (वय २७ वर्षे रा. बापदेव मित्र मंडळजवळ, किवळेगाव देहुरोड) याच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात २४१/२०२४भा.दं.वि कलम-२८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ नुसार गुन्पोहा दाखल केला आहे.
तिसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट १ ने (दि.२०) रोजी सायंकाळी ७..०० वा. सुमारास टॉवर लाईन मोरेवस्ती, चिखली येथील श्रेयस पान स्टॉल या दुकाणामध्ये केली. घरगुती गॅस मोकळया सिलेंडरमध्ये विनापरवाना भरत असताना मिळुन आला. आरोपीच्या ताब्यात एकुण २३,२०० रु किं चा मुददेमाल मिळुन आला. लहु दिनकर खाडे (वय २८ वर्षे, रा. टॉवरलाईन, चिखली) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात २९६ / २०२४ भा.दं.वि कलम २८५, जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह (पुरवठा अणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















