न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २२ मे २०२४) :-जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. या पालखी सोहळ्यासाठी दोन बैलजोडी व चौघडा गाडीसाठी एका बैलजोडीची श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने निवड केली जाते.
ज्या भाविकांना आपली बैलजोडी पालखी रथाला जुंपण्याची इच्छा असेल, त्यांनी २ जून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.
मुख्य मंदिराच्या कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जातील. अर्जासोबत बैलजोडीचे फोटो जोडण्याचे आवाहन संस्थानने इच्छुकांना केले आहे.