- भोसरीतील ‘स्पाईसअप इव्हेंट अॅण्ड कास्टींग’ संस्थेकडून लाखोंची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- भोसरीतील स्पाईसअप इव्हेंट अॅण्ड कास्टींग संस्थेतील पदाधिकारी तसेच मॅनेजर यांनी आपसात संगणमत करुन संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले. जो कार्यक्रमात विनर होईल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळणार, असे आमिष दाखवले.
तसेच कंपनीमध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून १,३१,००० रुपये तसेच साक्षीदार १) विशाल किसन जाधव (वय ३२ रा. कसबा पेठ पुणे) यांची रक्कम रुपये ५,७८,००० रुपये, २) अंजुन ओएज खान (वय ३७ रा. खांडेवाडी पुणे) यांची २,२०,००० रुपये, ३) अविनाश विठठलराव शिंदे (रा. औंध) यांची १,५०,००० रुपये, ४) जगजित सिंग (रा. केतन रेसिडन्सी मोशी यांची ८,००,००० रुपये, ५) अनुप्रिता उन्मेष पाटील (रा. लक्ष्मी नगर पुणे) यांची १,६०,००० रुपये अशी एकुन २०,३९,००० रुपये (वीस लाख एकोनचाळीस हजार रुपये) ची फसवणुक केली आहे.
हा प्रकार सन २०२२ पासुन ते जुलै २०२३ पर्यंत घडला. फिर्यादी ५२ वर्षीय महिलेने आरोपी १) माही ऊर्फ आरती मनोछा (वय ३२ वर्षे), २) रोहीत मनोछा (वय ३८ वर्षे, दोन्ही रा. दिल्ली), ३) निता राजधान कौल (वय ५० वर्ष रा. वाघोली पुणे), ४) मृदुल शर्मा (वय २९ वर्ष रा.इंदोर), ५) संजु नंदा (वय ३० वर्ष रा. न्यु दिल्ली) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ३२३/२०२४ भादवि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खाडे तपास करीत आहेत.