- पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा अखेर न्यायनिवडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ मे २०२४) :- पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं अल्पवयीन आरोपीला आज पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं. भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूत कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवालसह अन्य तिघांंनादेखील न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी वंदे मातरम या संघटनेने आरोपीवर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना अडवलं.
पोलीस तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे. आता त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा संपुर्ण तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे.या अपघाताचा संपुर्ण तपास होईपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाईल. तोपर्यंत त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.
णे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला, त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द करत अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.
पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.